Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

Surabhi Jayashree Jagdish

ब्रेन कॅन्सर

शरीरातील समस्या कोणतीही असो त्याचे काही ना काही संकेत आपल्याला मिळत असतात. असंच ज्यावेळी तुमच्या मेंदूमध्ये कॅन्सरचा ट्यूमर तयार होत असतो तेव्हा शरीर तुम्हाला काही इशारे करतं. हे इशारे काय असतात ते जाणून घेऊया.

शब्द आठवण्यात अडचण

काही लोकांना बोलताना योग्य शब्द सुचत नाही. काही व्यक्तींना यावेळी हे थकवा किंवा ताणामुळे होतं असं वाटतं. त्यामुळे सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं.

पण अशी समस्या वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Persistent headache

शरीरात मुंग्या येणं

काही लोकांना शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणं किंवा संवेदना कमी होण्याचा अनुभव येतो. यामध्ये रुग्णाच्या चेहऱ्याच्या आणि जिभेच्या अर्ध्या भागात सुन्नपणा जाणवतो. एकाच बाजूची समस्या दिसल्यास त्वरित तपासणी करणं आवश्यक आहे.

Vision problems causes

दृष्टीत बदल होणं

काही रुग्णांना दुहेरी दिसणं किंवा सरळ वस्तू वाकड्या दिसण्याचा त्रास होतो. सुरुवातीला डोळ्यांचा नंबर बदलल्यामुळे होतं असं वाटू शकतं. पण अचानक दृष्टीत बदल होणं हे मेंदूशी संबंधित गंभीर लक्षण असू शकतं.

Numbness in body

हस्ताक्षर खराब होणं

जर तुम्हाला लिहिण्यात कोणतीही समस्या जाणवत असेल तर सावध व्हा. तुमचा हात आणि डोळे यांच्याशी नीट समन्वय साधला जात नसेल तर वैद्यकीय तपासणी करणं महत्त्वाचं आहे.

Personality changes

स्वभावात बदल दिसणं

काही रूग्णांमध्ये सतत चिडचिडेपणा किंवा काम करण्याची इच्छा कमी होऊ शकते. अनेकांना हे फक्त थकवा किंवा मानसिक ताणामुळे होत असल्याचं वाटतं. पण स्वभावात अचानक मोठा बदल होणं हेही मेंदूच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

Memory and speech problems

सतत होणारी डोकेदुखी

सामान्य डोकेदुखी बहुतेक वेळा गंभीर नसते, पण काही रुग्णांना रोज तीव्र वेदना होऊ शकते. ही वेदना अनेक दिवस सतत सुरू राहते. अशी सततची डोकेदुखी दुर्लक्षित न करता त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

Neurological symptoms

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा