Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट ब्लॉकेज

हार्ट ब्लॉकेज म्हणजे हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. सुरुवातीला याची लक्षणं साधी वाटू शकतात त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वेळेत ओळख न झाल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.

छातीत दडपण येणं

हार्ट ब्लॉकेजचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत जडपणा, दडपण किंवा वेदना जाणवणं होय. ही वेदना काही वेळा चालताना, जिने चढताना अधिक वाढू शकते. अनेकदा ही वेदना काही मिनिटे टिकते आणि विश्रांती घेतल्यानंतर कमी होते.

थोडं चालल्यानंतरही श्वास लागणं

हार्ट ब्लॉकेजमुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही त्यामुळे शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो. यामुळे अगदी कमी अंतर चालल्यानंतरही श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

सततचा थकवा

कोणतंही कष्टाचं काम न करता देखील सतत थकवा जाणवणे हे हार्ट ब्लॉकेजचे संकेत असू शकतात. हृदय व्यवस्थित काम न केल्यामुळे शरीराच्या अवयवांना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे दिवसभर अशक्तपणा आणि काम करण्याची क्षमता कमी झाल्यासारखे वाटू शकतं.

खांदा, हात किंवा जबड्यापर्यंत वेदना होणं

हार्ट ब्लॉकेजमुळे होणाऱ्या वेदना केवळ छातीत मर्यादित राहत नाही. काही वेळा या वेदना डाव्या हातात, खांद्यात, पाठीमध्ये किंवा जबड्यातही पसरतात. अचानक अशी वेदना जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

चक्कर येणं

हृदयाकडे रक्तपुरवठा कमी झाल्यास चक्कर येणं किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणं अशी समस्या निर्माण होऊ शकते. काही लोकांना हृदयाचे ठोके खूप जलद किंवा अनियमित झाल्यासारखे जाणवू शकतात.

चुकीची जीवनशैली

अति तेलकट आणि जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते. ही चरबी हळूहळू रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करते आणि ब्लॉकेज वाढू शकतात.

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येते क्लिक करा