Surabhi Jayashree Jagdish
आजकाल हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येतंय. तसंच तरूणांमध्येही हार्ट अटॅक आणि हृदयाच्या इतर समस्या पाहायला मिळतात. ज्यावेळी हृदय कमकुवत होते तेव्हा त्याची काही लक्षणं दिसून येतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी तुमचं हृदय कमकुवत होतं तेव्हा त्याची काही लक्षणं पायामध्ये देखील दिसून येतात. ही लक्षणं काय आहेत ती पाहूयात.
पायात अचानक जडपणा जाणवणं, चप्पल घालताना बूट घट्ट वाटू लागणं अशी तक्रार जण तुम्हाला जाणवत असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ज्यावेळी तुमच्या हृदयामुळे काही समस्या असतात
हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्यास शरीरात द्रव साचू लागतो. त्यामुळे पायांमध्ये सूज येण्याची शक्यता असते. काही रुग्णांना थोडे चालल्यावर किंवा जिना चढताना पाय दुखणं, दम लागणं किंवा विनाकारण थकवा जाणवू शकतो.
हृदय कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक ताण आणि अपुरी झोप हे त्यातील मुख्य घटक आहेत.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कमी फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि सुकामेवा यांचा समावेश करावा. दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगा करणं फायदेशीर ठरतं.