Surabhi Jayashree Jagdish
सातारा जिल्हा हिवाळ्यात फिरण्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण मानला जातं. स्वच्छ हवा, डोंगरांचं शांत वातावरण, धबधब्यांच्या आसपासची थंडगार हवा आणि ऐतिहासिक किल्ल्यांची उपस्थिती यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.
थंडीच्या दिवसांत साताऱ्यातील निसर्ग आणखी खुलतो आणि प्रत्येक ठिकाणाची एक खास मोहकता जाणवते. खाली हिवाळ्यात पाहण्यासारखी साताऱ्यातील खास ७ ठिकाणं दिली आहेत.
कास पठार हे वर्षा-नंतर आणि सुरुवातीच्या हिवाळ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी भरलेलं दिसतं. इथली थंड हवा आणि निसर्गाची शांतता मन प्रसन्न करते.
साताऱ्याच्या माथ्यावर असलेला अजिंक्यतारा किल्ला हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहे. डोंगरावरून दिसणारं साताऱ्याचं दृश्य मोहक भासतं. हलकी थंडी आणि शांत वातावरण ट्रेकिंगचा आनंद वाढवतात.
समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड हा समाधीस्थळ असल्याने धार्मिक महत्त्व राखतो. हिवाळ्यात इथली हवा अतिशय प्रसन्न आणि स्वच्छ असते. सूर्योदय आणि सूर्यास्त या ठिकाणहून छान दिसतो.
साताऱ्याजवळचं महाबळेश्वर हिवाळ्यात सर्वाधिक गर्दीचं पर्यटनस्थळ असतं. पॉइंट्स, घाटमाथा आणि स्ट्रॉबेरीची बाग ही खास आकर्षणं आहेत.
पाचगणी हिवाळ्यातल्या शांत हवामानामुळे विशेष आवडतं. टेबल लँड, सिडनी पॉइंट आणि स्थानिक नैसर्गिक दृश्यं खूप मोहक वाटतात. शहरापासून दूर शांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण.
कास पठाराजवळचा शांत आणि स्वच्छ तलाव हिवाळ्यात पाहण्यासारखा ठिकाण आहे. तलावाकाठचा थंड वारा आणि शांत परिसर मनाला शांत करतो.