Sangli Tourism: गुलाबी थंडीत फिरायला जायचा प्लान करताय? लांब नको सांगलीतील 'या' ठिकाणी मज्जा घेऊन याच

Surabhi Jayashree Jagdish

हिवाळा

हिवाळा म्हणजेच थंडीच्या वातावरणात सांगलीची टूर करणं अगदी उत्तम मानला जातं. सांगली जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणं, मंदिरं, ऐतिहासिक वास्तू आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं.

गणपती मंदिर

सांगलीमधील नदीकिनारी असलेलं हे सुंदर गणपतीचं मंदिर हिवाळ्यात विशेष प्रसन्न वातावरण देतं. गार वाऱ्यात मंदिर परिसरात बसल्याने शांतता आणि जाणवते.

खंडेराय डोंगर

थंडीच्या दिवसांत या ठिकाणची डोंगररांग गार धुक्यात लपलेली दिसते. वरून दिसणारे गावाचं दृश्य पर्यटकांना मोहून टाकतं.

डोंगर टेकडी

हिवाळ्यात याठिकाणी ट्रेकिंगसाठी लोक जातात. हिरवळ आणि स्वच्छ हवा यामुळे फिरणं अधिक छान वाटतं होतं.

दत्त मंदिर

या मंदिराजवळचा परिसर हिवाळ्यात थंडगार वातावरणाने भरलेला असतो. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि परिसरातली शांतता मन प्रसन्न करते. धार्मिक स्थळांसोबत निसर्गाचाही सुंदर मेळ याठिकाणी अनुभवता येतो.

कृष्णा माई घाट

हिवाळ्यात नदीकिनारी येणं ही खूप मोठी मजा असते, कारण थंड हवेत पाण्याचं दृश्य अधिक सुंदर दिसतं. सकाळी धुकट वातावरण आणि शांत नदीकाठ मनाला वेगळाच अनुभव देतं.

तासगाव द्राक्षबाग परिसर

थंडीमध्ये याठिकाणी द्राक्षबागा पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. हिरवीगार द्राक्षबाग आणि गार वारा यामुळे ही जागा छान वाटते. स्थानिक द्राक्षांचा ताजा स्वादही इथे तुम्ही घेऊ शकता.

सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

येथे क्लिक करा