'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

TCS Nashik Harassment Case Full Details: नाशिकमधील TCS कंपनीतील छळवणूक प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पीडितेने लैंगिक छळ, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
Victim alleges shocking sexual and religious harassment in Nashik TCS workplace case
Victim alleges shocking sexual and religious harassment in Nashik TCS workplace casesaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: देशातील आयटी क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत आरोपींच्या अश्लील वर्तणुकीसोबतच, धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.

Victim alleges shocking sexual and religious harassment in Nashik TCS workplace case
HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट

अश्लील कमेंट्स अन् साडी खेचण्याचा प्रयत्न

फिर्यादीनुसार कंपनीतील आरोपी पीडित तरुणीला लज्जास्पद नावाने संबोधत असत. आरोपी तिला 'झिरो फिगर' म्हणून आवाज द्यायचे. तू क्या झिरो फिगर हो क्या? असे म्हणत तिची छेड काढली जात असे. इतकेच नव्हे तर, गुढीपाडव्याच्या दिवशी पीडिता साडी नेसून आली असता, एका आरोपीने पेंट्रीजवळ तिची साडी खेचून शरीराला स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रजा मेमन नावाचा आरोपी तिला 'प्लेअर' म्हणून संबोधत तिची छळवणूक करत होता.

Victim alleges shocking sexual and religious harassment in Nashik TCS workplace case
Nagpur News : हृदयद्रावक ! हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं हळहळ, नेमकं काय घडलं?

या प्रकरणात केवळ लैंगिक छळच नव्हे, तर धार्मिक छळ देखील होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी दानिश, शाहरुख, रजा मेमन आणि तौसिफ यांनी पीडितेच्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले. आमच्या धर्मात ये, तुझे वडील बरे होतील, असे सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. याशिवाय आरोपींनी हिंदू देवी देवतांसाह स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलही अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी केल्याचे समोर आले आहे.

Victim alleges shocking sexual and religious harassment in Nashik TCS workplace case
बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटलांची स्टंटबाजी|VIDEO

आरोपी दुसऱ्या टीममध्ये कार्यरत असतानाही जाणीवपूर्वक पीडितेच्या बाजूला येऊन बसत असत. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणे, वाईट नजरेने पाहणे आणि अश्लील कमेंट्स करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. तौसिफ आणि दानिश हे दोघेही स्वतःचे काम पीडितेवर ढकलून तिच्यावर मानसिक दबाव टाकत होते. तसेच, तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणींवरून तिला 'काळ्या जादू'चा आधार घेण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com