Nagpur News : हृदयद्रावक ! हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनं हळहळ, नेमकं काय घडलं?

Nagpur Tragedy : पाणी समजून तारपीन प्यायल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली.
हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, दोन वर्षीय मुलाचा मृत्यू
Nagpur medical hospitalsaam tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर | साम टीव्ही

नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडगाव परिसरात हृदयद्रावक घटना घडली. पेंटिंगच्या कामासाठी आणलेले तारपीन प्यायल्याने दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. (Nagpur Tragedy Two Year Old Dies After Mistaking Turpentine for Water) या घटनेमुळं हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अद्वविक शाम भदाडे असं मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. पेंटिंगच्या कामासाठी घरात तारपीनची बाटली आणली होती. ही बाटली घरातील स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आली होती. खेळता खेळता अद्वविक हा तिथे पोहोचला. पाणी समजून त्या बाटलीतील तारपीन तो प्यायला. यामुळे त्याची प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

भदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

भदाडे कुटुंब नागपुरातील वाठोडा पोलीस (Nagpur Tragedy News) ठाण्याच्या हद्दीतील बीडगाव परिसरात राहतं. या भदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात काही दिवसांपूर्वीच पेंटिगचं काम घेतलं होतं. ते पूर्णही झालं. या पेंटिंगच्या कामासाठी तारपीनची बाटली आणली होती. पेटिंगचं काम संपल्यानं ती बाटली स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आली होती. दोन वर्षीय अद्वविक हा १२ एप्रिलला संध्याकाळी घरात खेळत होता. खेळता खेळता तो त्या स्टोअर रुममध्ये पोहोचला. त्याला तिथे बाटली दिसली. त्या बाटलीमध्ये तारपीन होतं. पण पाणी समजून तो त्या बाटलीतील तारपीन प्यायला.

तारपीन प्यायल्याने अद्वविकची प्रकृती बिघडली. पालकांनी तातडीने त्याला पारडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. प्रकृती गंभीर असल्यानं त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच अद्वविकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भदाडे कुटुंबच कोसळलं. परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.

हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, दोन वर्षीय मुलाचा मृत्यू
Solapur Crime News: सोलापूर हादरलं! फैजानने बायकोला पेट्रोल टाकून पेटवलं

पालकांनो, काय काळजी घ्याल? (Child safety alert)

घरात तारपीन, आम्ल, कीटकनाशकं यांसारखे घातक द्रवपदार्थ असतात. ती सर्व मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावीत. बाटलीत असलेलं द्रव्य प्यायल्याने दोन वर्षांच्या बालकाला जीव गमवावा लागला. त्यामुळं आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, दोन वर्षीय मुलाचा मृत्यू
Accident : सकाळी भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकच्या धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com