Andhra Pradesh Kurnool pilgrims accident : दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात आज सकाळी भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. कुर्नूल जिल्ह्यातील चिलाकलाडोनाजवळ एका बोलेरो गाड आणि ट्रक यांच्यात जोरात धडक झाली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण जखमी झाले आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना उपचारासाठी एमिगनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्ती कर्नाटकातील यात्रेकरू होते. सर्वजण तिर्थयात्रेसाठी जात होते त्याचवेळी काळाने घाला घातला.
मंत्रालयम मंडलातील चिलकलडोना जवळ बोलेरो गाडी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला. १०-१२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एम्मिगनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख कर्नाटकातील यात्रेकरू म्हणून पटली आहे. सर्व यात्रेकरू चिक्कमगलूरू भागातील रहिवासी होते, अशी माहिती कुर्नूल पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयम मंडळातील चिलकलडोना गावाजवळ भाविकांच्या बोलेरो गाडीची ट्रकला समोरून जोरत धडकली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना तातडीने जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व १२ जखमींवर उपचार केले जात आहेत.
अपघातामधील सर्व मृतक हे कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील यात्रेकरू आहे. ते श्री राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी जात होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात दाखल केले असून सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी या अपघातप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. आंध्र प्रदेशचे परिवहन मंत्री मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.