संजय महाजन, साम टीव्ही
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये बस स्थानक व शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळब उडाली होती व या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकासह महसूल पथक व पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच आमदार चंद्रकांत पाटील हेदेखील कार्यकर्त्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून बिबट्याला सुरक्षित पकडून वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.