Satara News: राज्यभरात 'आल्याचा'प्रश्न पेटला; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, साताऱ्यासह पुण्यात वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड VIDEO

Swabhimani Shetkari Saghtana Protest Against Ginger Issue: साताऱ्यामध्ये सध्या 'आलं'प्रश्न पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं समोर आलंय.
 'आलं'प्रश्न पेटला
Swabhimani Shetkari Saghtana Protest Saam Tv
Published On

ओंकार कदम, साम टीव्ही सातारा

साताऱ्यात आल्याचा प्रश्न पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करावे, या मागणीसाठी आंदोलन पेटलं आहे. आल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील आलं रस्त्यावर ओतून दिलंय. टेम्पोची देखील तोडफोड केल्याचं समोर आलंय.

शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान

राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा, सांगली, औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करून आल्याची खरेदी केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान (Swabhimani Shetkari Saghtana Protest) होतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त केलं, तर वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड केलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी (Swabhimani Shetkari Saghtana) २३ जुलै रोजी रात्री मुंबई मार्केटला जाणाऱ्या वाहनामधील नवे जुने आलं एकत्र करत रस्त्यावर ओतून दिलंय. यावेळी आंदोलकांनी वाहनाच्या काचा फोडून हवा सोडून दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ठीकठिकाणी आंदोलन करत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आक्रमक झाल्याने प्रतवारी विरोधातलं आंदोलन आता पेट घेत असल्याचं पाहायला मिळतंय.

 'आलं'प्रश्न पेटला
Shetkari Sanman Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आज खात्यात जमा होणार ६ हजार रुपये, जाणून घ्या कसे?

पुण्यात देखील आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे मार्केटमध्ये देखील हंगामा पाहायला (Ginger Issue) मिळाला. यावेळी सरसकट खरेदी विक्रीसाठी आल्याचे लिलाव बंद पाडल्याचं समोर आलंय. आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Satara News) दिलाय. प्रतवारी केलेलं आले घेऊन मुंबईला जाणाऱ्या वाहनाची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर कापूरहोळ परिसरात मोडतोड केली. वाहनाच्या काचा फोडल्याचं समोर आलंय.

 'आलं'प्रश्न पेटला
Dhule Drought News: धुळे, नंदुरबारात दुष्काळ जाहीर करा; शेतकरी कष्टकरी संघटनेचा मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com