Shetkari Sanman Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आज खात्यात जमा होणार ६ हजार रुपये, जाणून घ्या कसे?

PM Kisan News: दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातील तब्बल ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये जमा होणार आहे.
PM Kisan Namo Shetkari Yojana
PM Kisan Namo Shetkari YojanaSaam TV
Published On

PM Kisan Namo Shetkari Yojana

दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातील तब्बल ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ६ हजार रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील कार्यक्रमातून ही बुधवारी (२८ फेब्रुवारी) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Kisan Namo Shetkari Yojana
Politics News: विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, राजकारणात खळबळ

यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्याचे २ हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे ४ हजार, असे एकूण ६ हजार रुपयांचा समावेश आहे. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत.

तसे पाहता खरीप, रब्बी हंगामात पेरणी, मशागत, खते आणि शेतमजुरांना मजुरी देण्यासाठी ही रक्कम यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती. मात्र, सरकारी कामांच्या विलंबामुळे या योजनेचा निधी ऐन उन्हाळ्यात मिळत आहेत. राज्य सरकारकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्रातील मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. प्रत्येकी २ हजार रुपये हप्त्यांच्या स्वरुपात ही मदत दिली जाते. आता त्यात राज्य सरकारने सुरू केलेल्या शेतकरी महासन्मान योजनेची देखील अंमलबजावणी करण्यात येत आहे.

राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी १७१२ कोटी रुपये इतकी रक्कम यापूर्वी देण्यात आली आहे. २०२३-२४ मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रत्येकी ६ हजार रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

PM Kisan Namo Shetkari Yojana
Maharashtra Politics: लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दुहेरी धक्का बसणार? आजी-माजी खासदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com