Himachal Pradesh Political News
Himachal Pradesh Political News Saam tv

Politics News: विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित, राजकारणात खळबळ

Himachal Pradesh Politics: हिमाचल प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केलं आहे.
Published on

Himachal Pradesh Political News

हिमाचल प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केलं आहे. सभागृहाच्या कामकाजादरम्यान गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोपाखाली विधानसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली आहे. यामुळे हिमाचल प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Himachal Pradesh Political News
Maharashtra Politics: लोकसभेपूर्वी शिंदे गटाला दुहेरी धक्का बसणार? आजी-माजी खासदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवारपासून (ता. २८) शिमला येथे सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. (Latest Marathi News)

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी विधानसभेचं कामकाज तातडीने स्थगित करत भाजप आमदारांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मात्र, तरी देखील आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभापतींनी मार्शलला बोलावून आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले.

त्यामुळे भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केली. इतकंच नाही, तर काही आमदारांनी सभागृहात सभापतींच्या खुर्चीवर कागद देखील फेकले. भाजप आमदार हंस राज आणि इतरांनी मेरा 'रंग दे बसंती' गाणे म्हणत आपला निषेध नोंदवला.

या घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी विरोधीपक्षनेते आमदार जयराम ठाकूर, डॉ. विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, डॉ. हंस राज, डॉ. जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शौरी, दीप राज, पूर्णा ठाकूर, इंदरसिंग गांधी. दिलीप सिंग, ठाकूर आणि रणबीर सिंग यांना सभागृहाच्या कामकाजातून निलंबित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com