एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार तसेच खासदार त्यांच्यासोबत गेले. इतकंच नाही, तर नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदेंच्या नेतृत्वाला पसंती दिली. इतक्या मोठ्या संख्येने आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अचानक साथ सोडल्याने ठाकरे गटाला मोठी गळती लागली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र, आता लोकसभेपूर्वी शिंदे गटाला (Eknath Shinde) दोन मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण, शिंदे गटाचे दोन आजी-माजी खासदार शिवसेना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील एक विद्यमान खासदार उद्धव ठाकरे आणि दुसरे माजी खासदार अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना सोडून गेलेले माजी आमदार तसेच नेत्यांना परत आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहे. अशातच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात परतणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्यामागे कारणही तसंच आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी एका कार्यक्रमात बोलताना हेमंत गोडसे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा केा आहे. ठाकरे गटात परतण्यासाठी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील शिंदेंची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. शिवाजीराव पाटील हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची मनापासून इच्छा असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.