Weather Alert: महाराष्ट्रासह १५ राज्यांना अवकाळी पाऊस अन् गारपीटीचा इशारा; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट...

Weather Update Today: आजपासून (ता. २८) गुरुवारपर्यंत (१ मार्च) देशातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणखीच धुमाकूळ घालणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Weather Alert
Weather AlertSaam TV
Published On

Weather Forecast 28 February 2024

देशासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून अनेक भागांना वादळी वाऱ्यासह गारपीटीचा तडाखा बसला आहे. यामुळे रबी पिकांसह फळबागांची मोठी नासधूस झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळीचं संकट कधी दूर होईल? असा प्रश्न बळीराजाला पडलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Alert
Breaking News: भाईंदरमधील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक, थरकाप उडवणारा VIDEO

अशातच, भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे. आजपासून (ता. २८) गुरुवारपर्यंत (१ मार्च) देशातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणखीच धुमाकूळ घालणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रावरही अवकाळीचं संकट कायम राहील, असं सांगण्यात आलंय. (Latest Marathi News)

राज्यात मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट (Rain Alert) होण्याचाही अंदाज आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके झाकून ठेवावी, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

नव्याने सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशाच्या हवामानावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या कर्नाटकच्या दक्षिणेपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासोबतच वाढती आर्द्रता नोंदवली जाऊ शकते.

पुढील ४८ तासांत या राज्यांना पावसाचा इशारा

IMD नं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, चंदीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूर येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही प्रांतासह गारपीटीचीही शक्यता आहे.

Weather Alert
Railway Ticket: लोकसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेल्वे तिकीट दरात मोठी कपात, प्रवाशांना दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com