Dhule Drought News: धुळे, नंदुरबारात दुष्काळ जाहीर करा; शेतकरी कष्टकरी संघटनेचा मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा

Dhule Drought : नंदुरबारहुन निघालेला हा मोर्चा धुळे, मालेगाव, नाशिक त्याचबरोबर संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. मुंबईवर मंत्रालयात धडकणार आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धुळे पोलिसातर्फे तैनात करण्यात आलाय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयाकडे निघालाय.
Dhule Drought :
Dhule Drought : Saam Tv
Published On

(भूषण अहिरे)

Dhule Drought News :

सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या संघटनांसह आदिवासी संघटनेने मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा नंदुरबारहून मंत्रालयाचे दिशेने जात असताना धुळ्यात पोहोचलाय. हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये आदिवासी बांधव सहभागी आहेत. हे लाल वादळ नंदुरबारहून मुंबई मंत्रालयाच्या दिशेने निघालाय.(Latest News)

नंदुरबारहुन निघालेला हा मोर्चा धुळे, मालेगाव, नाशिक त्याचबरोबर संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. मुंबईवर मंत्रालयात धडकणार आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त धुळे पोलिसातर्फे तैनात करण्यात आलाय. संघटनेच्या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात पोहोचताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा मोर्चा २३ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचेल. जर सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिलाय. या मोर्चाला रामसिंग गावीत, करणसिंग कोकणी, किशोर ढमाले, सुभाष काकुस्ते हे मार्गदर्शन करत आहेत.

काय आहेत मागण्या

  • नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत.

  • पेसा कायदा व वनहक्क कायदा यावर आक्रमण करणारा वनसंरक्षण कायदा (दुरुस्त) २०२३ त्वरित रद्द करावा.

  • केंद्र शासनाने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमालाला हमी भाव देणारा कायदा करावा,शेतकऱ्यांना हमीभाव आणि कष्टकऱ्यांना अनुदान देऊन अन्न सुरक्षा कायद्याची (रेशन) अंमलबजावणी करावी.

  • मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी.

  • बनावट आदिवासी हटवावेत आणि आदिवासी यादीतली घुसखोरी थांबवावी आदी मागण्या या मोर्चाकऱ्यांचा आहेत.

दरम्यान राज्यातील अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यात गेल्या काही दिवसांआधी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. नुकसानग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. तसेच केंद्राच्या टीमकडून राज्यातील परिस्थितीची पाहणी करुन घ्यावी. राज्यातील संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लावावी अशीही मागणी त्यांनी केलीय.

Dhule Drought :
Beed News : दूध दरवाढीसाठी बीडमध्ये लक्षवेधी आंदोलन; आंदोलकांनी मसाला दुधाचे केले वाटप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com