

दिवेआगर येथे कोचिंग क्लासच्या सहलीदरम्यान आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर खाजगी क्लासच्या सहलींमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी कठोर नियमावली (एसओपी) लागू करावी, अशी मागणी ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनचे अध्यक्ष रोहित श्यामसुंदर दंडवते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालक संघटना आणि जागरूक नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींसाठी शिक्षण विभागाकडून नियमावली लागू केली जाते. मात्र, खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींचे नियोजन, परवानगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुरेशी नियंत्रण व्यवस्था नसल्याचा मुद्दा दंडवते यांनी उपस्थित केला आहे. दिवेआगर येथील दुर्घटना आणि मुरूड येथे यापूर्वी १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
ं
शाळा आणि महाविद्यालयांच्या सहलींसाठी शिक्षण विभागाकडून नियमावली लागू केली जाते. मात्र, खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींचे नियोजन, परवानगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुरेशी नियंत्रण व्यवस्था नसल्याचा मुद्दा दंडवते यांनी उपस्थित केला आहे. दिवेआगर येथील दुर्घटना आणि मुरूड येथे यापूर्वी १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
क्लासचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
दिवेआगर दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कोचिंग क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संबंधित क्लासची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची गरजही पालक संघटनेने अधोरेखित केली आहे.
सहलींसाठी सुरक्षा नियम बंधनकारक करा
खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी स्वतंत्र आणि कडक एसओपी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. समुद्रकिनारे, धरणे आणि किल्ले यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक करावे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट, प्रशिक्षित जीवरक्षक, विद्यार्थ्यांचा विमा आणि वाहनाचे वैध फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र घेणेही बंधनकारक करावे. सहलीचे ठिकाण, प्रवासाची व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पालकांना आधीच माहिती देण्याची तरतूद नियमावलीत असावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
१५ दिवसांची मुदत; अन्यथा न्यायालयात जाणार
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन दंडवते यांनी केले आहे. येत्या १५ दिवसांत खाजगी कोचिंग क्लासच्या सहलींसाठी कडक एसओपी लागू न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
खाजगी क्लासच्या सहलींचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी स्पष्ट नियम, जबाबदारी निश्चित करणारी यंत्रणा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असावी, अशी भूमिका ग्लोबल पेरेंट्स टीचर असोसिएशनने मांडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.