Mahayuti seat sharing formula Maharashtra MLC election : विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असलेला 'पुणे शिक्षक मतदारसंघ' अखेर भाजपच्या वाट्याला आला आहे. यासंदर्भात महायुतीच्या सर्व घटकांमध्ये एकमत झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
१५ संभाव्य नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सादर
या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन १५ संभाव्य उमेदवारांची यादी सुपूर्द केली आहे. भाजप महायुतीत ज्या ३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, त्या प्रत्येक जागेसाठी ५ अशा एकूण १५ नावांचा पर्याय वरिष्ठ नेतृत्वाकडे सोपवण्यात आला आहे.
महायुतीचा असा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला:
भाजप: पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर.
शिवसेना (शिंदे गट): अमरावती मतदारसंघ.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ.
इच्छुकांची समजूत काढण्याचे आव्हान
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार दावा ठोकला होता. मात्र, दीर्घ चर्चेअंती ही जागा भाजपला देण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. आता या जागेवर दावा सांगणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठ नेत्यांकडून समजूत काढली जाणार आहे.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या संभाव्य नावांवर केंद्रीय नेतृत्व लवकरच शिक्कामोर्तब करणार असून, आगामी दोन दिवसांत अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.