दर्शन, पार्किंग, हॉटेल… सगळ्याच्या नावाखाली शिर्डीमध्ये फसवणूक, दलालांवर अखेर प्रशासनाचा मोठा दणका

Strict Action Against Agents In Shirdi Sai Baba Temple: शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलली असून कलम 152 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
Shirdi administration initiates strict action against agents misguiding and cheating Sai Baba devotees.
Shirdi administration initiates strict action against agents misguiding and cheating Sai Baba devotees.Saam Tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत भाविकांची अडवणूक करून दिशाभूल आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा दलाल आणि दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 152 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Shirdi administration initiates strict action against agents misguiding and cheating Sai Baba devotees.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार, दिग्गज नेत्याची घोषणा

साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असतात. मात्र काही दलालांकडून भाविकांची सार्वजनिक रस्त्यांवर, चौकात तसेच मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांवर अडवणूक करून त्यांची दिशाभूल केली जात होती. खासगी पार्किंगमध्ये वाहन लावण्यास भाग पाडणे, स्वतः अधिकृत प्रतिनिधी असल्याचा बनाव करणे तसेच भाविकांना चुकीची माहिती देऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय काही दलालांकडून भाविकांना ठराविक हॉटेल, लॉज, धर्मशाळा तसेच दुकानांकडे जबरदस्तीने वळवले जात होते.

Shirdi administration initiates strict action against agents misguiding and cheating Sai Baba devotees.
महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

पूजा साहित्य ठराविक दुकानांतूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात असून जादा दराने साहित्य विक्री करून भाविकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी कलम 152 अन्वये सशर्त प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार कोणालाही साईबाबा संस्थान, पोलीस प्रशासन किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणेचा प्रतिनिधी असल्याचा आभास निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Shirdi administration initiates strict action against agents misguiding and cheating Sai Baba devotees.
१२ जिल्ह्यात शनिवारी शाळांना सुट्टी, सरकारी ऑफिसही राहणार बंद; दारूच्या दुकानांना असेल कुलूप, कारण काय?

दर्शन, निवास, भोजन किंवा इतर सेवांच्या नावाखाली मध्यस्थी करणाऱ्या दलालांवरही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी दिलीये..प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक थांबेल, दर्शन व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनेल तसेच कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com