

• शंकर अण्णा धोंडगे यांचा अख्खा पक्ष शिवसेनेत विलीन होणार
• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार
• नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय हालचाल
• लोहा-कंधार मतदारसंघातील समीकरण बदलण्याची शक्यता
जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान राज्यात मोठी घडामोड घडली आहे. राज्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. लवकरच एक अख्खा पक्ष शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन होणार आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. शंकर अण्णा धोंडगे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची नांदेड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धोंडगे यांचा महाराष्ट्र राज्य समिती हा पक्षसुद्धा शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.
माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे राज्यातील २२ जिल्हाध्यक्ष शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बीआरएसने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शंकर अण्णा धोंडगे यांनी बीआसएसच्या धरतीवर एमआरएस हा पक्ष काढला होता. शेतकरी चळवळीपासून शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.
शंकर अण्ण धोंडगे हे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडून ते आमदार म्हणून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. शेतकरी नेते म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.