Maharashtra Politics: जो महापौरपद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, 'या' महापालिकेत भाजप-ठाकरेसेनेची युती होण्याची शक्यता

Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महानगर पालिकेत कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महापालिकेत ठाकरेसेनेचा महापौर होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप-ठाकरेसेनेची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेसाठी महापौर पदावर जो समर्थन देईल. त्यांच्यासोबत आम्ही जाऊ अशी भूमिका ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरी यांनी साम टिव्हीशी बोलतांना सांगितलं. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे गट एकत्र सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे आमदार किशोर जोरगेवार, बंटी भांगडीया यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. जो महापौरपद देतील, त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, असे चंद्रपूरमधील शिवसेना ठाकरे गटाने ठरवले आहे.

निवडणूकीपूर्वी आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी आघाडी केली नाही. आता आमच्यापुढे पर्याय खुला आहे, शिवसेना ठाकरे गटाते चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी ही माहिती दिली. 'काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर चंद्रपूरात सत्तेसाठी भाजपचा पर्याय खुला आहे. काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाचे सहा नगरसेवक आणि वंचितचे दोन अशा आठ नगरसेवक सध्या आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आमचा पक्ष वाढावा यासाठी आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा द्यायला आमचे वरिष्ठ पातळीवर होकार आहे.' असे म्हणत संदीप गिरी यांनी उद्धवसेनेला महापौर पद मिळालं यासाठी भाजपसोबत जाऊ शकतो असे संकेत दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com