Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले
Chandrapur Crime Saam Tv

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Chandrapur Crime: चंद्रपूरमध्ये २७ वर्षीय विवाहित महिलेची नवऱ्याने हत्या केली. बायकोला जिवंत जाळून आरोपीने घरातून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
Published on

Summary -

  • चंद्रपूरच्या गौतम नगरात विवाहितेला जिवंत जाळलं

  • बायकोची हत्या करून नवऱ्याने घराचा दरवाजा बंद करून काढला पळ

  • उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

  • पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली

चंद्रपूरमध्ये विवाहितेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली वार्डातील गौतम नगर भागात ही घटना घडली. ५ जानेवारीला ही घटना घडली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या गौतमनगर परिसरात दीक्षा शुभम भडके (२७ वर्षे) या महिलेची नवऱ्याने ह त्या केली. ५ जानेवारीला ही घटना घडली होती. शुभमने रात्री ११ वाजता घरी येत दिक्षाला पेटवून दिले होते आणि दार बंद करून निघून गेला होता. आरडाओरडा झाल्यानंतर शेजारी राहणाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडला तर त्यांना दिक्षा जळालेल्या अवस्थेत आढळून आली. जखमी अवस्थेत तिला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले
Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

दिक्षाची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान ७ जानेवारीला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिक्षाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. चंद्रपूर शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करत दिक्षाच्या नवऱ्याला अटक केली. शुभमने दिक्षाची हत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले
Crime News : बाबा मला मासिक पाळी आलीये...मुलगी विनवण्या करत होती, पण पैशांना हपापलेल्या बापानं सौदा केला, शरीरसंबंध...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com