Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात उज्जैन देवदर्शनासाठी निघालेल्या ७ मित्रांपैकी शेवगावचे ३ तरुण ठार, तर इतर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...
Jalgaon Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • कन्नड घाटातील वळणावर कारवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात

  • ७ मित्रांच्या ग्रुपमधील ३ तरुण ठार, ४ गंभीर जखमी

  • वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर, मोठे नुकसान

  • जखमींवर जवळच्या रुग्णालयात तातडीने उपचार सुरू

संजय महाजन, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. उज्जैन येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या तिघांवर काळाने घाला घातला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे दर्शनासाठी एका मित्रांचा ७ जणांचा ग्रुप जात होता. देवदर्शनासाठी निघालेल्या या तरुणांच्या आनंदावर विरझन पडले. चारचाकीने निघालेल्या या तरुणांवर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला.

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे भगव्याआड लपलेला सैतान, शिंदेंसेनाचं आयुष्य कोंबडीच्या आयुष्या एवढं, ठाकरेंच्या आमदाराचं वक्तव्य

या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आहे. मृत तरुणांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातादरम्यान चालक मद्यधुंद होता का? हा अपघात कसा झाला यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com