पैशांसाठी बापाने केला मुलीचा सौदा
मुलीला शरीर संबंध ठेवण्यास भाग पडले
नराधम बापासह १२ जणांना अटक
पोलीस तपास सुरु
वडिलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या मोहात तुडुंब बुडालेल्या एका नराधम बापाने स्वतःच्या मुलीला पैशांसाठी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. या संतापजनक प्रकारात पीडितेची आजी आणि घरातील आणखी कुटुंबीयांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बाप, आजीसह १२ जणांना अटक केली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातील बिरूर येथे घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यानंतर ती आपल्या नातेवाईकांकडे राहून अभ्यास करत होती. १२वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे परत आली होती. मात्र परत आल्यानंतर जे तिच्यासोबत घडलं तो प्रसंग अंगावर काटा उभा करणारा ठरला.
डिसेंबर महिन्यात वडील आपल्या मुलीसह आजीकडे गेले. तेथे दोन दिवस थांबले. दरम्यान पैशासाठी आजी आणि वडिलांनी मिळून मुलीला विकण्यासाठी व्यवहार केला. याच दरम्यान भरत शेट्टी नावाचा एक व्यक्ती तेथे पोहोचला, ज्याने पीडितेच्या वडिलांना मोह दाखवला की जर मुलगी या धंद्यात आली तर ती रोज ५ हजार रुपये कमावू शकते. याचं वाक्याला भुललेल्या नराधम बापाने आपल्या मुलीचा सौदा केला.
त्यांनतर पीडितेला मंगळूर येथे घेऊन जाण्यात आले. प्रवासात तिने तिच्या वडिलांना मासिक पाळी आली असून तिची तब्बेत ठीक नसल्याचं म्हटलं. मात्र दगडाच्या काळीज असणाऱ्या त्या बापाला जरा देखील पाझर फुटला नाही. त्याने तरीही मुलीला २० ते ४५ वर्षे वयाच्या चार पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मुलीने विरोध केल्यानंतरही तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले.
सलग दोन तीन दिवस उलटून गेल्यानंतर तरुणीने हिंमत एकवटून पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी नराधम बापासह १२ जणांना ताब्यात घेतले. तपासात समोर आले आहे की भरत शेट्टी दक्षिण कन्नड जिल्ह्यात देह व्यापाराचे मोठे नेटवर्क चालवतो. त्याच्यावर मंगळुरु आणि उडुपीमध्ये यापूर्वीच वेश्यावृत्तीचे ८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिस आता या टोळीशी संबंधित इतर लोकांच्या शोधात छापेमारी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.