Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Political News: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. बीडमधील माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
Published On

Summary:

  • जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान बीडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली

  • बीडमधील माजी आमदाराने शरद पवारांची साथ सोडली

  • माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला

  • शेकडो समर्थकांसह त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं

बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना जोरदार झटका दिला. राष्ट्रवादीच्या बड्या महिला नेत्याने पक्षाची साथ सोडली असून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान बीडमध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद चांगलीच वाढली आहे. या पक्षप्रवेशामुळे बीडमधील केज मतदारसंघाचे राजकीय समीकरण बदलले आहे.

भाजप पक्षात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला होता. त्यांच्याकडे महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी शरद पवारांची देखील साथ सोडली.

Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा, महापालिकेतील पराभव जिव्हारी लागला

संगीता ठोंबरे यांनी वर्षभरातच दुसऱ्यांदा पक्ष बदलला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. संगीता ठोंबरे यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा पक्ष बदलल्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
Kolhapur Politics: कोल्हापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये संगीता ठोंबरे यांनी धनुष्यबाण हाती घेतले. संगीता ठोंबरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. संगीता ठोंबरे यांच्यासोबत अनेक नेते आणि पदाधिकारी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू केंद्रे, अशोक सक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले.

Beed Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना धक्का, बड्या महिला नेत्याचा शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश
Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com