BJP workers brutally attacked by hawkers in Kurla Mumbai
BJP workers brutally attacked by hawkers in Kurla MumbaiSaam TV Marathii

Mumbai : मुंबईमध्ये जोरदार राडा, भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, डोक्यावर भयंकर वार, व्हिडिओ व्हायरल

Mumbai hawkers violence : मुंबईतील कुर्लामध्ये फेरीवाल्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी लावण्याच्या वादातून झालेल्या या मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले.
Published on

मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी साम टीव्ही मऱाठी

BJP workers brutally attacked by hawkers in Kurla Mumbai : मुंबईतील कुर्लामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गजबलेल्या कुर्ल्यामध्ये भाजपच्या ३ ते ४ कार्यकर्त्यांना स्थानिक फेरीवाळ्यांनी बेदम मारहाण केली. धंद्यासमोर गाडी लावण्यावरून शा‍ब्दिक वाद झाला, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समजेय. भाजपच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर जखम झाली आहे. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आकाश सिंग, आदित्य पानसे असीम सिंग असे जखमी भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.

कुर्लामधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाणीच्या घटनेची दखल तात्काळ पोलिसांनी घेतली आहे. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. कुर्ला पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. महापौरपदाची चर्चा सुरू आहे. मुंबईला भाजपचा पहिला महापौर मिळणार आहे. याची राजकीय चर्चा मुंबईत सुरू असतानाच कुर्ल्यातील फेरीवाल्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारल्याचा प्रकार समोर आलाय.

BJP workers brutally attacked by hawkers in Kurla Mumbai
NCP Merger: अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल, मगच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, शरद पवारांच्या आमदारांचं मोठं विधान

कुर्लामधील न्यू मिल रोड येथे आकाश सिंग, आदित्य पानसे असीम सिंग यांच्यावर फेरीवाल्यांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आकाश सिंग यांच्या डोक्यावर थेट पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आला. त्याशिवाय तिघांवर धारदार शस्त्रांनीही वार केले गेले. आकाश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आदित्य पानसे व असीम सिंग यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे.

BJP workers brutally attacked by hawkers in Kurla Mumbai
ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांनी डाव टाकला, जिल्हा परिषदेसाठी घेतला मोठा निर्णय

भाजप कार्यकर्त्यांना कुर्ला परिसरात बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले. मारहाणीच्या या घटनेनंतर संतप्त सकल हिंदू समाजाने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर सुमारे दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केले. दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. धंद्या समोर गाडी लावण्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

BJP workers brutally attacked by hawkers in Kurla Mumbai
Mumbai Mayor election : ठाकरे-फडणवीसांमध्ये मुंबई महापौरावर चर्चा झाली का? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com