

कोल्हापुरात शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का
समरजीत सिंह घाटगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी भाजपचे डावपेच
रणजीत माजलगाव, साम प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कोल्हापुरातील राजकीय वारं फिरलंय. मोठा राजकीय डाव टाकत भाजपनं शरद पवार गटातील बडा नेत्याला आपल्या गळाला लावलंय. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्यासोबत युती करणाऱ्या समरजीत सिंह घाटगे शरद पवार गटाला रामराम करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेनंतर जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून डावपेच आखले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील दमदार नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर समरजीतसिंह घाटगे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. समरजीतसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. त्यामुळे समरजीतसिंह घाटगे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पवे फुटलाय. राज्यातील महापालिकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपनं जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू केलीय. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह समरजीतसिंह घाटगे देखील उपस्थित होते. गेली अनेक दिवस समजीत सिंह घाडगे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. अद्यापही समरजीत सिंह घाटगे यांचा भाजप मधला प्रवेश निश्चित झाला नसला तरीही ते लवकरच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करतील असं मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. इतकेच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समरजीतसिंह घाटगे यांच्या गटाचे उमेदवार कमळ चिन्ह घेऊन लढणार, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
कागल नगरपरिषदेसाठी शाहू ग्रुपचे प्रमुख समरजीतसिंह घाटगे यांनी राजकीय वैर विसरत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी युती केली होती. कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आणि जनतेच्या विकासाठी युती करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नगरपरिषदेच्या निवडणुका होऊन काही काळ लोटत नाही तोच समरजीतसिंह घाटगे आपल्या पक्ष बदलणार आहेत. लोकसभेला समरजीतसिंह घाटगे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्याविरोधात दंड थोपटले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.