Maharashtra Politics: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? राज्याच्या राजकारणात उलटफेर होणार, 3 बड्या नेत्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण

Shinde-Thackeray Group Alliance : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकींमुळे युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Shinde-Thackeray Group Alliance
Speculation rises after key political leaders meet amid talks of Shiv Sena unity in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ

  • महापालिका निकालानंतर महापौरपदासाठी हालचालींना वेग

  • जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडींची गणिते

राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात २९ महापालिकांपैकी बहुसंख्य महापलिकांत भाजप हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरलाय. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचदरम्यान राजकीय पक्षांनी जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गटाने मुलाखती सुरू केल्या आहेत. त्याचदरम्यान एक मोठी बातमी हाती आली आहे. राज्यातील दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Shinde-Thackeray Group Alliance
भावकीनं भाजप प्रवेश थांबवला; दोन भावांमधील वाद चव्हाट्यावर आला, भरसभेत माजी मंत्र्यांवर आरोप

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडलाय. महापालिकेच्या निवडणुकानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनाचा महापौर व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलंय. याच दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राजकारणात खळबळ उडवून दिलीय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा निर्माण झालीय.

Shinde-Thackeray Group Alliance
मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक जिंकण्यासाठी या एकत्रिकरणासाठी चर्चा चालू झालीय. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यामध्ये शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्या सोमवारी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची धाराशीव येथे संयुक्त बैठक होणार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या अनुषंगानेच धाराशिव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्यासाठी आमदार तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी मोटबांधण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com