Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा, महापालिकेतील पराभव जिव्हारी लागला

Nagpur Municipal Corporation Election: नागपूर महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाचा मोठा पराभव झालाय. पराभवाच्या धक्क्यानंतर पक्षाला आणखी एक धक्का लागलाय. शहरप्रमुख दुनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Sharad pawar news
Sharad pawar Saam t
Published On
Summary
  • नागपूर महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाचा दारुण पराभव

  • ५० हून अधिक उमेदवार असूनही एकही जागा जिंकता आली नाही

  • पराभवाची जबाबदारी घेत शहराध्यक्ष दूनेश्वर पेठेंचा राजीनामा

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोठ्या पराभवाचा समोरे जावे लागले. निवडणुकीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसलाय. नागपूरमध्ये शरद पवार गटानं 50 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरविले होते, मात्र सर्वच उमेदवार पराभूत झाले. या पराभवाची जबाबदारी घेत शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा दिलाय.

Sharad pawar news
Pune Politics: घड्याळाची 'वेळ' चुकली, पवारांची युती फसली; पुणे आणि पिंपरी हातातून गेलं

नागपूर महापालिकेच्या १५१ जागांसाठी मतदान झालेल्या मतदानात भाजपनं बाजी मारली. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, एमआयएमसह स्थानिक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

यात भाजपनं सरशी घेत मोठा विजय मिळवला. भाजपने येथे १५१ पैकी १०२ हून अधिक जागा जिंकल्या आहे. यामुळे राज्याच्या उपराधानीतही भाजपचा महापौर होणार आहे. तर शरद पवार गटाला येथे मोठा पराभव सहन करावा लागलाय.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने ५० पेक्षा अधिक उमेदवारांना रिंगणात उतरवलं होतं. पण शरद पवार गटाचा एकाही उमेदवार विजयी झाला नाही. या पराभवाची जबाबदारी घेत शरद पवार गटाचे नागपूर शहराचे अध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात स्वत: दूनेश्वर पेठे ही उतरले होते, मात्र त्यांचाही पराभव झालाय. दुनेश्वर पेठे हे प्रभाग २३ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मागील वेळी ते एकमेव नगरसेवक म्हणून निवडणून आले होते. ते आमदारकीसाठी सुद्धा उभे राहिले होते, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

Sharad pawar news
मोठी बातमी! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

नुकत्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. यापुढे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत राहील करता मी माझा राजीनामा देत आहे, असे पत्र दूनेश्वर पेठे यांनी अनिल देशमुख यांना दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com