मोठी बातमी! पवारविरुद्ध पवार संघर्ष संपला; महानगरपालिकेनंतर ZP निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

Maharashtra Politics Sharad Pawar and Ajit Pawar Alliance: महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकतेचे संकेत दिलेत. राष्ट्रवादीचे दोन्ही गट जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढवू शकतात.
Sharad Pawar And  Ajit Pawar Alliance
Sharad Pawar and Ajit Pawar during a crucial meeting at Baramati’s Govind Baug amid talks of NCP unity.Saam Tv
Published On
Summary
  • पवारविरुद्ध पवार संघर्ष संपण्याचे स्पष्ट संकेत

  • बारामतीतील गोविंद बागेत शरद व अजित पवारांची दीड तास बैठक

  • महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर एकत्र येण्याची भूमिका

मंगेश कचरे , साम प्रतिनिधी

लोकसभा विधानसभा निवडणुकीत पवारविरुद्ध पवार असा संघर्ष आपण पाहिला होता, मात्र आता पवारविरुद्ध पवार लढत होणार नसून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आज बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दोन्ही पवारांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पवार एकत्र आलेत. पाहूयात यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट.

Sharad Pawar And  Ajit Pawar Alliance
Pune Politics: घड्याळाची 'वेळ' चुकली, पवारांची युती फसली; पुणे आणि पिंपरी हातातून गेलं

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक दोन्ही पवार एकत्र लढले मात्र मतदारांनी दोघांनाही डावल आणि भाजपला स्वीकारला. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपची सरशी ठरली आहे. यानंतर बारामतीत मोठी खलबत्त घडलीत आहेत. महापालिकांच्या निवडणुकातील पराभवानंतर अजित पवारांनीच थेट शरद पवारांचे निवासस्थान गाठलं. दोघांमध्ये तास-दीड तास चर्चा झाली.

Sharad Pawar And  Ajit Pawar Alliance
BMC Election: मुंबईतील 25 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवली; दोन्ही ठाकरे बंधूंचा करिष्मा का कमी पडला?

या चर्चेत पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री राजेश टोपे, माझी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, यांसहआमदार रोहित पवार ही सहभागी होते. आणि अखेर या चर्चेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्यावर शिक्कामार्फत झालं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चेने गेल्या अनेक दिवसापासून जोर धरलाय.

अशातच महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पवार एकत्र लढले. आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही पवार एकत्र आलेत. मात्र या निवडणुका ईव्हीएम वरती नको तर बॅलेट पेपर वरती व्हाव्यात आणि गेल्या अनेक दिवसापासून मतदारांची तशी मागणी आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान गोविंद बागेत तासभर झालेल्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता दादा म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कुठलीही चर्चा झाली नाही. राज्यपालांचा नियोजित दौरा रद्द झाल्यानं कुलगुरूंच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होतं आपण सर्व एकत्रच गोविंद बागेतून जाऊ, असा निरोप मला होता म्हणून मी गोविंद बागेत आलो होतो.

शशिकांत शिंदे यांनी काय सांगितलं मला माहित नाही.मी त्याबाबत माहिती घेईल आणि मग बोलेल. ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे स्थानिक लेव्हलवर अधिकार देत असतो.केंद्रात आणि राज्यात एनडीएच सरकार आहे आणि आमचं काम तिथं सुरू आहे. मतदार राजा महत्त्वाचा असतो प्रयत्न करण राजकीय पक्षाचं काम असतं.

मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका लढवल्या त्यांना यश मिळाल्या इतरांचा पराभव. पण पराभव नाही खचून जायचं नसतं काम करत राहायचं असतं असं म्हणत अजित पवार आणि शरद पवारांनी पुन्हा मोठ बांधली आहे. बारामती मधील एग्रीकल्चर कॉलेजमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी बंदरावर चर्चा करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी इच्छुक असणाऱ्या मुलाखती घेतल्यात.

आधी लग्न कोंढाण्याचा जिल्हा परिषदेवर बोलू.. जिल्हा परिषद महत्वाची निवडणूक असून कार्यकर्त्याची आहे त्यासाठी एकत्र करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय. पुण्याची जिल्हा परिषद राज्यात नाहीतर देशात अतिशय उत्तमपणे काम करणारी जिल्हा परिषद आहे त्यावर जबाबदार लोकांनी निवडून जावून या जिल्ह्याची आन बाण आणि शान उंच व्हावी, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. पवारविरुद्ध पवार संघर्ष बाजूला ठेवून दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांना अपयश आले आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवणार असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती यश मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com