Pune Politics: घड्याळाची 'वेळ' चुकली, पवारांची युती फसली; पुणे आणि पिंपरी हातातून गेलं

Pune and Pimpri-Chinchwad Election: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपनं बाजी मारलीय. मात्र पवारांचा हा बालेकिल्ला नेमका का ढासळला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Pune and Pimpri-Chinchwad  Election
BJP workers celebrate after the party’s decisive victory in Pune and Pimpri-Chinchwad municipal elections.saam tv
Published On
Summary
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय

  • पवारांची राष्ट्रवादी युती अपेक्षेनुसार यशस्वी ठरली नाही

  • एकेकाळचा पवारांचा बालेकिल्ला भाजपने सर केला

24 महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची विजयी घोडदौड पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही कायम राहिली. एकीकडे भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरीत एकत्र आल्या. मात्र एकेकाळी या दोन्ही शहरांवर वर्चस्व असणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना का करावा लागला? पाहूयात.

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात ताकद विभागली गेली. त्यात पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र आल्या तरी फुटीच्या अनुभवामुळे भाजपविरोधी मतदार थेट काँग्रेसकडे वळले. भाजपविरोधी मतदार विखुरल्यानं भाजपला महापालिकेत फायदा.दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे, शंकर जगताप यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानं समीकरण बदलली. पिंपरीत भाजपनं आणलेल्या मोठ्या प्रकल्पांमुळे मतदारांचे भाजपला झुकते माप. तसचं विरोधक विखुरलेले असल्याचा थेट फायदा सत्ताधारी भाजपला.

Pune and Pimpri-Chinchwad  Election
Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

दरम्यान पुण आणि पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीतील विसंवाद आणि जागावाटपावरून झालेला रस्सीखेच...तसचं बुथ लेव्हल यंत्रणेवर नसणारी मजबुत पकड यामुळे दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसलाय. त्यामुळे दोन्ही महापालिकांवर भाजपनं एकहाती सत्ता मिळवलीय. आता पुणे आणि पिंपरीतील पराभवानंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com