Pune Zilla Parishad Elections
BJP leaders during a key meeting in Pune after the party’s strong performance in municipal elections.Saam tv

Zilla Parishad Election: महापालिकेतील विजयानंतर भाजपचे सूर बदलले; जिल्हा परिषदेसाठी स्वबळाचा नारा

Pune Zilla Parishad Elections: महापालिकांचे निकाल लागल्यानंतर भाजपने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
Published on
Summary
  • महापालिका निकालांनंतर भाजपचा दबदबा स्पष्ट झाला

  • पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का

  • जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाचा नारा दिला

गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या २९ महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापालिकांच्या निकालांमध्ये भाजपचा दबदबा दिसत आहे. २९ पैकी २५ ते २६ महापालिकांमध्ये भाजप वरचढ असल्याचं दिसत आहे. पुण्यातसुद्धा भाजपनं जबरदस्त कामगिरी करत ९० जागांवर आघाडी घेतलीय.

Pune Zilla Parishad Elections
पुणे-पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांवर कोणाची 'दादागिरी' चालणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाला जबरदस्त धक्का बसलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा होता मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला पछाडलंय. पुण्यातील निकाल आपल्या बाजुने लागताच भाजपनं आपले सूर बदलण्यास सुरुवात केलीय.आगामी जिल्हा परिषदेसाठी भाजपनं आता स्वबळाची तयारी करणार असल्याचं दिसत आहे.

Pune Zilla Parishad Elections
Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

पुण्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय. आगामी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणनिती संदर्भात आणि उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

तसेच पुणे जिल्हा परिषदेत भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवावी असा सूर बैठकीत उमटला. या बैठकीला पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्षांसह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या निवडणुक प्रचारात भाजप आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून दोन्ही पक्षात जुंपली होती.

दरम्यान आज राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. यात भाजपचा सर्वत्र बोलबाला दिसत आहे. पुण्यातही भाजपनं मोठा विजय मिळवलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युती होती. त्यांची लढत दोन्ही राष्ट्रवादीसोबत होती. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची युती झाली होती. पुण्यात भाजपनं ९० जागांवर आघाडी घेतलीय.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. शहरात सरासरी ५८ टक्के मतदान झाले. २०१७च्या निवडणुकीतील ६५.३५ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे ७.३५ टक्क्यांची घट नोंदविली गेली. मतदानातील ही घसरण राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरली होती. कमी मतदानाचा फायदा भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी ६५ जागांची गरज आहे. दरम्यान पुणे महापालिकेच्या निकालावर बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले, भाजपनं काम केली आहेत. लोकांनी जनतेने तेच पाहून मतं दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com