पुणे-पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांवर कोणाची 'दादागिरी' चालणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

saam exit poll : पुणे-पिंपरी-चिंचवडच्या महापालिकांच्या निवडणुकीचा एक्झिट पोल हाती आला आहे. या दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची जादू चालल्याचे एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.
pune politics
pune news Saam tv
Published On

मुंबई,पुण्यासह २९ महापालिकांसाठी आज गुरुवारी मतदान पार पडलं. यंदा झालेल्या निवडणुकीत मुंबईबरोबर पुणे,पिंपरी-चिंचवडमध्येही महाराष्ट्राचं विशेष लक्ष होतं. राज्यातील २९ महापालिका हद्दीतील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे संभाव्य कल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजपचा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

pune politics
2 महिला अन् 3 पुरुष नको त्या अवस्थेत; गुपचूप सुरू होतं भलतंच प्रकरण, खोलीतील प्रकार पाहून पोलीस चक्रावले

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्ये निवडणुकीची लढाई पाहायला मिळाली. पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढले. तर शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढले. महायुतीमधील झालेल्या लढाईत भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारल्याचे संभाव्य कलातून समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलवा असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसून आलं.

pune politics
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

एक्झिट पोलनुसार, पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंना फारशी कमाल करता आलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला फारशी कमाल करता आलेली नाही. पुण्यात काही ठिकाणी अपक्ष उमेदवार देखील निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे - संभाव्य कल

भाजप - ७०

शिंदे - १२

दोन्ही राष्ट्रवादी- ५५ +10 (SP)

ठाकरे बंधू - ६

काँग्रेस - ८

इतर - ३

पिंपरी-चिंचवड - संभाव्य कल

भाजप-७०

शिंदेसेना - ५

दोन्ही राष्ट्रवादी - 40 +7 (SP)

ठाकरे बंधू - ४

काँग्रेस - शून्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com