Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Beed Local Body Election: बीडच्या परळी नगरपरिषदेत गटनेता निवडीला शिवसेना- राष्ट्रवादीला एमआयएमने दिलेला पाठिंबा मागे घेतला. शिवसेनेवर झालेल्या आरोपानंतर आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला इशाऱ्यानंतर एमआयएमने पाठिंबा स्वतःहून मागे घेतला.

बीडच्या परळी नगरपरिषद निवडणुकीच्या गटनेता निवडी दरम्यान शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसला एमआयएमने पाठिंबा देत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिवसेना आणि एमआयएमची युती झाली असे आरोप शिवसेनेवरती झाले आणि यानंतर शिवसेनेने आपण एमआयएमसोबत गेलो नाहीत आणि युतीही केली नाही. राष्ट्रवादी- भाजप आणि शिवसेनेची युती असून गटनेतेच्या निवड प्रक्रियादरम्यान एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. यात आमच्या कुठलाही सहभाग नाही एक तर एमआयएमला बाजूला काढा नाही तर आम्हाला गटामधून जाण्याची परवानगी द्या अशी भूमिका शिवसेनेने जाहीर केली. त्यानंतर स्वतःहून एमआयएमच्या नगरसेविका शेख आयाशा यांनी गटनेते वैजनाथ भानुदास राव सोळंके यांच्याकडे बाहेर पडण्याचा निर्णय घेत पत्र दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com