Maharashtra MLAs London study tour : राज्य विधिमंडळाचे 15 आमदार 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. यात भाजप, शिंदेसेना आणि ठाकरेसेनेच्या आमदारांचा समावेश आहे.. लंडनमधील शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचाही अभ्यास करणार आहेत. भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उबाठाकडून सरदेसाई यांचा समावेश आहे. या भेटीत शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार आहे.
1. बाबासाहेब देशमुख
2. परिणय फुके
3. विक्रम पाचपुते
4. नमिता मुंदडा
5. निरंजन डावखरे
6. स्नेहा दुबे
7. विक्रांत पाटील
8. अमित गोरखे
9. विक्रम काळे
10. विश्वजीत कदम
11. वरुण सरदेसाई
12. मनिषा कायंदे
13. सुमित वानखेडे
14.योगेश टिळेकर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.