'पाणी द्या नाही तर कर्नाटकात जाऊ'; सोलापूरच्या उद्विग्न गावकऱ्यांची भूमिका

Solapur Villagers Warns Government: राज्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी काही गावांमध्ये भयाण परिस्थिती आहे. काही गाव थेट पाण्यासाठी विक्रीला काढली आहेत.तर काही गावांनी थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय.कुठली आहेत ही गावं? आणि काय आहे इथलं वास्तव? पाहुयात या रिपोर्टमधून.
Solapur Water Crisis: ‘give Us Water Or Let Us Go To Karnataka
Solapur Water Crisis: ‘give Us Water Or Let Us Go To Karnatakasaam tv
Published On: 

पाहिलात हा फलक, राज्यात दुष्काळ जाहीर झालेला असताना सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या तुळशी गावची व्यथा काही वेगळीच आहे. माढा तालुक्यातलं हे तुळशी गावातली पाणीटंचाई काही आज कालची नाही. तर गेल्या 25 वर्षांपासून या गावाचा घसा कोरडा आहे. प्रशासनाकडे खेटा घालून इथल्या गावकऱ्यांनी पाण्याची वारंवार मागणी केली. मात्र ना इथल्या लोकप्रतिनिधींनी, ना इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी.कुणीही इथला पाणी प्रश्न सोडवला नाही. त्यामुळे उद्विग्न आणि संतप्त गावकऱ्यांना अखेर ग्रामसभेत ठराव मांडून गाव विकायला काढलंय. एव्हंढच नव्हे तर संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांना साद घातलीये.

तर पाणी नसल्याने शेती तर सोडाच, पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. गावातील महिला रोज 2 ते 3 किलोमीटर दूरवरून पाण्यासाठी पायपीट करतात. तर गावातील तरुण वर्ग पाण्याच्या शोधात स्थलांतराच्या वाटेवर आहे. पाण्याची टंचाई आता तरुणांच्या लग्नावरच उठलयी. गावातले 300 हून अधिक तरुण मुलं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची लग्न जमत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.

Solapur Water Crisis: ‘give Us Water Or Let Us Go To Karnataka
Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर

विशेष म्हणजे, तुळगीगावातल्या गावकऱ्यांचा उदरनिर्वाह दूध उत्पादनावर चालतो. गेल्या सहा महिन्यांपूर्वी दररोजचं 40 हजार लीटर दुधाचं उत्पादन घटून ते आता केवळ 15 ते 20 हजार लीटरवर आल्यानं शेतकऱी अडचणीत आले आहेत. केवळ तुळशीगावच नव्हे तर सांगली जिल्ह्यातल्या उटगी गावही असंच अनेक वर्षांपासून तहानलेलं आहे. अखेर उटगी गावच्या ग्रामस्थांनीही पाण्यासाठी थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय.

Solapur Water Crisis: ‘give Us Water Or Let Us Go To Karnataka
दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

एकीकडे, सरकारनं राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलाय.मात्र या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना आता मदतीची आस लागलीय. तर दुसरीकडे या गावांमधल्या गावकऱ्यांना साधं पाणीही पिण्यासाठी नाही.त्यांच्यासाठी सरकार काही करणार का हा सवाल आहे. पाण्यासाठी गाव विकण्याची वेळ येणं ही बाब निश्चितच गंभीर आहे. तुळशी गावा पासून हाकेच्या अंतरावर उजनी धरण असताना ही येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय. धरण उशाला कोरड घशाला अशीच अवस्था येथील ग्रामस्थांची शेतकऱ्यांची झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com