दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Maharashtra Drought Crisis: महाराष्ट्र सरकारनं दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी विरोधकांनी सत्ताधाऱ्याना चांगलच घेरलयं. अशातच कर्नाटकात दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानं महाराष्ट्रात दुष्काळग्रस्तांना दिलासा कधी मिळणार? विरोधकांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी कसा आक्रमक पवित्रा घेतलाय? पाहूयात या रिपोर्टमधून.
opposition demands immediate drought declaration in Maharashtra
opposition demands immediate drought declaration in Maharashtrasaam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीवरून विरोधकांकडून सरकारकडे तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

  • पावसाच्या तुटीचा आणि दीर्घ कोरड्या कालावधीचा खरीप पिकांवर परिणाम

  • प्राथमिक माहितीच्या आधारे पहिली दुष्काळ अधिसूचना लवकरच जारी करण्याचे संकेत

महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे शेजारील कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर केल्याचा दावा विरोधकांनी केलाय. त्यामुळे "कर्नाटक तातडीने निर्णय घेऊ शकते, मग महाराष्ट्र सरकार कोणाच्या आदेशाची वाट पाहतयं? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.

तर दुसरीकडे कर्नाटक सरकारनं दुष्काळ जाहीर केला नाही, तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेली अधिसूचना जाहीर केलीय, असं दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय.मात्र कुंंभमेळ्याचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या, असं म्हणाऱ्या राऊतांना फडणवीसांनी काय प्रत्त्युत्तर दिलयं पाहा.

opposition demands immediate drought declaration in Maharashtra
शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत 'या' ३ योजना; सरकार देते तब्बल ५ पाच लाखांचं कर्ज, वाचा संपूर्ण माहिती

22 सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव तसेच कृषी विभागाचे सचिव राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आलाय. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची चिन्ह आहेत. मुळात पावसाच्या लहरीपणामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची आणि अधिकृत घोषणेची शेतकऱ्यांना तातडीने गरज आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना लवकर दिलासा देईल, हीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com