अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये बिघाडी.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवणार.
पद्मजादेवी, उर्वशीदेवी आणि धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
नगराध्यक्ष पदासाठी दिव्यांनी रास्ते यांची नेमणूक; तिरंगी लढत अपेक्षित.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष प्रवेशाचा जोरदार धडाका लागला आहे. मित्रपक्षच एकमेकांना जोरदार धक्का देताना दिसत आहे. अद्यापही या निवडणुका एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत ठोस निर्णय झाला नाहीये. आशात अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.
येथे भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही (अजित पवार गट) ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्ष पदासाठी दिव्यांनी रास्ते यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली.
आज जनसेवा संघटनेचे धवलसिंह मोहिते पाटील आणि पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अकलूज नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अकलूज नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष नगरसेवक यांचे राष्ट्रवादीकडून 26 ए बी फार्म जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिले आहेत. अकलूजमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे.
दोन दिवसापूर्वी धवलसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अकलूजमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. अकलूज हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे होम ग्राऊंड आहे. मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपने मोर्चे बांधणी केली आहे. अशातच आता धवलसिंह मोहिते यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अकलूज मध्ये तिरंगी लढत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.