Bihar Polls Boost BJP: बिहार विजयानंतर भाजपच्या नेतृत्वात लवकरच होणार फेरबदल|VIDEO

BJP Set For Key Leadership: बिहार निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयानंतर पक्षात केंद्रीय आणि राज्यस्तरावर संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष बदल आणि नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिहार निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता देशातील भाजपची स्थिति आणि भक्कम झाली आहे. आता या निकालानंतर भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची नियुक्ती ही रखडलेली आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा मोदी सरकारमध्ये मंत्री झाले आहे. आणि त्यांची अध्यक्षपदाची वाढीव मुदतही संपलेली आहे.

बिहारमध्ये एनडीएचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर दिल्लीमध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षच्या नियुक्तीच्या हालचालीना वेग आल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाच्या चर्चेला गती मिळाली आहे. येत्या आठवड्यात केंद्र तसेच राज्यस्तरावर खांदेपाटल होऊ शकते.याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबतही हालचाली सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या बदलांचा परिणाम म्हणून राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com