Election Commission PC Live : धुरळा उडाला! नगरपालिका-नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल, असा आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Maharashtra Election Commission Press confrence 2025 : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे. या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.
Election Commission
Election Commission Press confrenceSaam tv
Published On
Summary

नगर पंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा

आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅप विकसित

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वमीवर या पत्रकार परिषदेला महत्व प्राप्त झालं आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील टप्प्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकीचा कार्यक्रम सांगितला.

राज्यातील सर्व निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दि ले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, नगर परिषद आणि नगर पंचायती संबंधित माहिती देणार आहोत. 246 नगर परिषदांमध्ये 10 नवीन नगर परिषद समावेश आहे. 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. 15 नवनिर्मित नगरपंचायती आहेत.

Election Commission
BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

'नगर परिषदची निवडणूक बहुसदस्य पद्धतीने 288 अध्यक्ष निवडले जाणार आहेत. नगर परिषदेच्या एक वार्डमध्ये दोन किंवा 3 जागा असणार आहेत. या निवडणुकीसाठी 1 कोटी 7 लाख 30 हजार 576 एवढे मतदार असणार आहेत. निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सद्वारे होणार आहे, असे ते म्हणाले.

राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे पुढे म्हणाले, 'मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल अॅप विकसित केलंय. या अॅपवर मतदारांना त्यांचं नाव मतदार केंद्र, उमेदवारांविषयी माहिती मिळेल. तसेच त्यात गुन्हेगारी, शैक्षणिक, आर्थिक संपत्तीविषयी माहिती मिळू शकेल'.

Election Commission
Buldhana News : अजित पवारांना मोठा धक्का; बाजार समितीच्या १३ सदस्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव, नेमकं काय घडलं?

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

अर्ज दाखल १० नोव्हेंबर

अंतिम तारीख १७ नोव्हेंबर

छाननी - १८ नोव्हेंबर

माघारी घेण्याची मुदत - २५ नोव्हेंबर

निवडणूक चिन्ह नेमूण देणं - २६ नोव्हेंबर

मतदान - २ डिसेंबर २०२५

मतमोजणी - ३ डिसेंबर २०२५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com