BMC Election : आगामी निवडणुकीत RPI महायुतीतून लढणार, पण...; रामदास आठवलेंनी सगळंच सांगितलं

Ramdas Athawale : आगामी निवडणुकीत आरपीआय महायुतीतून लढणार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले. ते महाडमध्ये बोलत होते.
Union Minister Ramdas Athawale NEWS
Union Minister Ramdas Athawale Saam Tv
Published On
Summary

रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवणार

समाधानकारक जागा न मिळाल्यास पक्ष स्वबळावरही लढणार

महाड येथे रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापनदिन पार पडला

'मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष महायुतीसोबत निवडणुका लढणार आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्यात येणार नाहीत. त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर उमेदवार निवडूण आणून रिपब्लिकन पक्षाची राज्याच्या राजकारणावर आपली चांगली छाप निर्माण करावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

महाड येथे चांदे मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या 69व्या वर्धापनदिनानिमित्त आयेजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. प्रंचड मुसळधार पाऊस महाड येथे कोसळत असताना या भरपावसात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. परिवर्तन कला महासंघाच्या गायकांनी भीमगीते सादर केली. ती भीमगीते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे भाषण भरपावसात श्रोत्यांनी ऐकले. यावेळी विचार मंचावर मंत्री भरतशेठ गोगावले उपस्थित होते. भरतशेठ गोगावले यांनी रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत केले.

Union Minister Ramdas Athawale NEWS
7,000mAh बॅटरी, 256जीबी स्टोरेज अन् कॅमेराही जबरदस्त; खिशाला परवडणारा फोन बाजारात

येत्या 20 मार्च 2027 मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चवदार तळे आणि महाड शहारातील क्रांतीस्तंभ सर्व क्रांतीभूमीचे सौंदर्यीकरण विकास कामे करण्यात येतील. अमृतसर गोल्डन टेम्पलच्या तलावाच्या धरतीवर चवदार तळ्याचे जल शुध्दीकरणाचा प्रकल्प उभारण्यात येईल, असे भरतशेठ गोगावले यांनी जाहीर केले.

येत्या 2027 मध्ये चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचा भव्य सोहळा महाड येथे साजरा करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने भरीव निधी आणून महाड चवदार तळे क्रांतिभूमी असलेल्या या ऐतिहासिक महाड शहराचे रुपडे पालटण्यात येईल असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

'स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवली पाहिजे. त्यासाठी केवळ बौध्दवाड्यांमध्ये ; बौध्द वस्तीमध्ये रिपब्लिकन पक्षाची शाखा नको, तर सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन गावागावात रिपब्लिकन पक्षाची शाखा स्थापन केली पाहिजे. गावागावत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकला पाहिजे. सर्व समाजाल सोबत घेतले पाहिजे'.

Union Minister Ramdas Athawale NEWS
Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

'महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एका जाती धर्माचा पक्ष नसून सर्व जाती धर्मीयांचा पक्ष आहे. सर्व जाती धर्मीयांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com