7,000mAh बॅटरी, 256जीबी स्टोरेज अन् कॅमेराही जबरदस्त; खिशाला परवडणारा फोन बाजारात

realme smartphone : रिअलमीच्या नव्या फोनमध्ये 7,000mAh बॅटरी, 256जीबी स्टोरेज, कॅमेरा जबरदस्त मिळत आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडणारा फोन बाजारात आला आहे.
realme mobile
realme smartphone Saam tv
Published On
Summary

रियलमीने C सीरीज अंतर्गत Realme C85 5G आणि Realme C85 Pro 4G हे दोन स्मार्टफोन लाँच

दोन्ही फोनमध्ये ७०००mAh बॅटरी आणि ४५W फास्ट चार्जिंग सुविधा

C85 5G मध्ये Dimensity 6300 तर C85 Pro 4G मध्ये Snapdragon 685 प्रोसेसर

मोबाईल Android 15 आधारित Realme UI 6, ५०MP कॅमेरा आणि IP69 रेटिंगसह

स्मार्टफोन ब्रँड रियलमीने सी-सीरीजचे दोन स्मार्टफोन बाजारात लाँच केले आहेत. रियलमीने Realme C85 5G आणि Realme C85 Pro 4G हे दोन मोबाइल लाँच केले आहेत. दोन्ही फोन विएतनाममधून लाँच करण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Realme C85 5G मध्ये 144Hz रिफ्रेश रेट एसीडी डिस्प्ले आणि Dimensity 6300 चिपसेट आह. C85 Pro 4G मध्ये AMOLED स्क्रीन आणि Snapdrgon 685 प्रोसेसर देखील आहे. दोन्ही फोनमध्ये 50 MP कॅमेरा आणि Android 15 आधारित Realme UI 6 देण्यात आला आहे.

Realme C85 5G ची किंमत विएतनाममध्ये ७,६९०,००० VND इतकी आहे. तर भारतात ही रक्कम २६,१०० रुपये इतकी आहे. या मोबाइलमध्ये 8gb +256 gb मॉडेल इतकी आहे. Relme C85 Pro 4G ही सुरुवातीची किंमत 6,490,000 VND इतकी असून भारतात ही रक्कम २२,१०० रुपये इतकी आहे. या मोबाईलमध्ये देखील 8gb +128 gb स्टोरेज आहे. 256gb व्हेरिएंटची किंमत भारतात 24,100 रुपये आहे. दोन्ही फोन्स Parrot purple आणि Peacock green रंगामध्ये उपलब्ध आहे.

realme mobile
Monday Horoscope : कामाची धावपळ आणि दगदग वाढणार; ५ राशींच्या लोकांना हितशत्रूंचा त्रास संभवतोय

Realme C85 5g मध्ये 6.8 इंचाचा HD+LCD डिस्प्ले आहे. 144Hz रिफ्रेश रेट आणि 1200 नीट्स पीक ब्राइटनेस मिळतोय. तसेच Mediatek Dimensity 6300 प्रोसेसरहून कमी आहे. 8gb रॅम आणि 256 gb स्टोरेज देखील मिळतोय. IP69 प्रोटेक्शनमुळे फोन धूळ आणि पाणी यापासून सुरक्षित राहतो. तसेच फोनला 7,000mAh 45W फास्ट चार्जिंग देखील मिळतो. Wifi 5, bluetooth 5.0 आणि यूएसबी-सी कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

realme mobile
Mumbai : मुंबईत पुन्हा आढळला मतदारयादीत घोळ; एकाच व्यक्तीचे तीन EPIC नंबर, मनसेने पुरावाच दिला

Realme C85 Pro 4G मध्ये 6.8 इंचचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देखील आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 4000 निट्स पीक ब्राइटनेस देखील मिळतो. यात Qualcomm Snapdragon 685 चिपसेट आहे. 8GB रॅम आणि 128 GB किंवा 256GB स्टोरेज देखील मिळतो. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP रियर सेन्सर आणि 8MP फ्रंट कॅमेरा देखील मिळतोय. फोनमध्ये Android 15 realme UI 6 आहे. या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग, ड्युअल स्पीकर, साइड फिंगरप्रिंट आणि IP69 रेटिंग मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com