Sambhajinagar: भाजप नेत्याचा मृतदेह आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ

Sambhajinagar BJP Leader Death: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप नेत्याचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली. पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिस सध्या तपास करत आहेत.
Sambhajinagar: भाजप नेत्याचा मृतदेह आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ
Sambhajinagar BJP Leader DeathSaam Tv
Published On

Summary -

  • संभाजीनगरमध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळला

  • गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ मृतदेह आढळला

  • गणेश टेमकर असं भाजप नेत्याचे नाव होतं

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे

माधव सावरगावे, संभाजीनगर

छपत्रपती संभाजीनगरमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. भाजप नेत्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळून आला. गंगापूर तालुक्यातील नारावाडी शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar: भाजप नेत्याचा मृतदेह आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ
Shocking : प्रेमाचा भयंकर शेवट! जंगलात सापडला तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, हत्या की आत्महत्या?

हदियाबाद- नारवाडी मार्गावर नारवाडी शिवारात नळकांडी पुलाजवळ गणेश टेमकर यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

Sambhajinagar: भाजप नेत्याचा मृतदेह आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ
Shocking: हुंडा प्रकरणात तडजोड केली नाही, नवऱ्याने सर्व मर्यादा ओलांडल्या; बायकोचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकले

गणेश टेमकर यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याचा तपास पोलिस सध्या करत आहे. या घटनेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गणेश टेमकर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, असा परिवार आहे. गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Sambhajinagar: भाजप नेत्याचा मृतदेह आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ
Shocking News : मुंबई हादरली! तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, जबरदस्ती लिंग परिवर्तन, तृतीयपंथींच्या टोळीचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com