Kalyan : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती

Maharashtra Political News : माजी महापौर रमेश जाधव यांनी ठाकरे गटाचा निरोप घेत शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. KDMC निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय गणितात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Kalyan : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary

माजी महापौर रमेश जाधवांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश

KDMC निवडणुकीपूर्वी राजकारणात मोठी खळबळ

जाधवांच्या निर्णयाने कल्याण-डोंबिवलीतील समीकरणे बदलण्याची शक्यता

ठाकरे गटाला मोठा धक्का

स्थानिक नेत्यांकडून जाधवांचे स्वागत

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

डोंबिवली पालिका निवडणुकांचा माहोल चांगलाच तापला असताना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर व शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते रमेश जाधव यांनी आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दमदार तयारी सुरु आहे. अशातच मुंबईतील आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख निलेश शिंदे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत रमेश जाधव यांनी धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

Kalyan : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती
Accident News : नवस फेडायला गेले, पण परत आलेच नाहीत; तो गुरुवार ठरला शेवटचा, पुणे अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

यावेळी वरिष्ठ नेत्यांनी जाधव यांचे स्वागत करत आगामी KDMC निवडणुकीत शिंदे गट अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. रमेश जाधव यांच्या प्रवेशामुळे कल्याण–डोंबिवलीतील राजकीय गणितात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर म्हणून कार्यरत असताना जाधव यांनी परिसरात मजबूत पक्षसंघटना उभी केली होती.

Kalyan : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेतलं हाती
NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

त्याच प्रमाणे शहरा मोठ्या प्रमाणात विकास कामे केली होती त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा ठाकरे गटावर परिणाम होणार हे निश्चित मानले जात आहे. निवडणुकांच्या अगोदर होणाऱ्या या राजकीय हालचालींमुळे कल्याण–डोंबिवलीत राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com