NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Smart Highway India : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) महामार्गांवर कॅमेरा-आधारित स्वयंचलित टोल प्रणाली लागू करणार आहे. वाहनांची नंबर प्लेट स्कॅन करून फास्टॅगमधून टोल आपोआप वसूल केला जाणार असून यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल.
NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना
Smart Highway IndiaSaam Tv
Published On
Summary

NHAI महामार्गांवर कॅमेरा-आधारित स्वयंचलित टोल प्रणाली लागू करणार

वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करून फास्टॅगमधून टोल आपोआप वसूल होईल

ही प्रणाली सुरुवातीला चेन्नई-बेंगळुरू आणि जीएसटी रोडवर लागू होईल

वाहतूक कोंडी टळेल आणि प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल

महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक मोठा तांत्रिक उपक्रम हाती घेतला आहे. चेन्नई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि GST रोडवरील टोल बूथ कॅमेरा-आधारित स्वयंचलित टोल प्रणालीने बदलले जाणार आहेत. ही प्रणाली कॅमेऱ्याने वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करेल आणि चालकाच्या FASTag खात्यातून टोलची रक्कम आपोआप कापून घेईल. यामुळे गाडीचालकासह प्रवाशांचा वेळ वाचेल. शिवाय यामुळे टोल प्लाझा वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल

नवीन प्रणाली काय आहे?

या नवीन तंत्रज्ञानाला मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) म्हणतात. ही प्रणाली ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्यांवर आधारित आहे. ही प्रणाली ताशी १५० किमी वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांच्या लायसन्स प्लेट्स स्कॅन करू शकते. वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागू नये आणि सहज प्रवास सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे. NHI सुरुवातीला चेन्नई-बंगळुरू महामार्गावरील नेमिली आणि चेनासमुद्रम टोल प्लाझावर तसेच जीएसटी रोडवरील परानूर टोल प्लाझावर ही प्रणाली लागू करेल. या तीन महामार्ग विभागांमधून दररोज अंदाजे ७५,००० वाहने ये जा करतात.

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना
Winter Update : हुडहुडी वाढली! तापमान २ ते ८ अंशांनी घसरलं, मुंबई पुण्यासह राज्यात गुलाबी थंडी

ही नवी प्रणाली कशी काम करते?

नवीन प्रणालीमध्ये, ओव्हरहेड कॅमेरे वाहनाची नंबर प्लेट आणि व्हिडिओ क्लिप ४० मीटर अंतरावरून कॅप्चर करतील. आरएफआयडी देखील ३०० मीटर आधीच वाहन ओळखतील. यानंतर, फास्टॅगमधून टोल आपोआप कापला जाईल आणि वाहन न थांबता पुढे जाईल. जर काही कारणास्तव टोल कापला गेला नाही तर चालकांकडून पैसे वसूल करण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया राबवली जाईल.

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना
Sharad Pawar News : "माझं लग्न होत नाही कृपया... " लग्नाळू तरुणाचं थेट शरद पवारांना पत्र, वाचा नेमकं काय म्हणाला....

स्मार्ट महामार्गाचा एक नवीन प्रवास

या प्रकल्पाची देखरेख रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) कडून केली जाईल. कंपनीने सिस्टमच्या डिझाइन, विकास आणि देखभालीसाठी पाच वर्षांची निविदा आधीच जारी केली आहे. कामाचा आदेश मिळाल्यापासून १४ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी सिस्टमची अनेक टप्प्यात चाचणी केली जाईल. एकदा ही प्रणाली लागू झाली की देशात स्मार्ट महामार्गाचा एक नवीन प्रवास सुरू होईल. शिवाय टोल प्लाझाला लागणाऱ्या लांबलचक रांगा नाहीशा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com