सोलापूर : उन्हाळ्याची दाहकता वाढत असतानाच मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. रोहिणी आणि मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने गावागावांतील पाण्याची टंचाई आटोक्यात आली आहे. दरम्यान, मागील सात दिवसांत जिल्ह्यातील १२५ टैंकर बंद करण्यात आले आहेत. मात्र आजही ९९ टँकर ७८ गावे, ६२८ वाड्या वस्त्यांवर सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची भाषण टंचाई जाणवत होती. टंचाई निवारण्यासाठी गावांमध्ये टँकर सुरु करण्यात आले होते. दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात (Solapur) पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मान्सून दाखल होताच दमदार पाऊस पडला. या पावसाने ओढे, नाले, पाझर तलावाला पाणी आले आहे. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय बोअर, विहिरींना पाणी वाढले आहे. पंढरपूर, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागात चांगला पाऊस पडला आहे. चांगला पाऊस पडल्याने पाण्याची सोय झाल्याने टँकर बंद करण्यात आल्याच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आल आहे.
तरीही ७८ गावात पाण्याची झळ कायम
जुलै महिन्यात पुन्हा चांगला (Rain) पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे जुलैअखेर जिल्ह्यातील टँकर संख्या शून्यावर येईल आणि जिल्हा टँकरमुक्त होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात जूनअखेर ७८ गावांत पाणी टंचाईची झळ अजूनही कायम आहे. ७८ गावे, ६२८ वाड्यांवरील २ लाख ३४ हजार ९३६ लोकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्वाधिक टँकर करमाळा, मंगळवेढा, सांगोला तालुक्यात सुरू असून सर्वात कमी माढा, अक्कलकोट,बार्शी येथे सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.