Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय

BJP Backed Panel Claims Victory In Solapur: सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलला मोठं यश मिळाले. या पॅनलने १८ जागांवर विजय मिळवला.
Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Solapur Bank Election ResultSaam Tv
Published On: 

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले. या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने एकूण १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर मोहिते-पाटील यांच्या पॅनलला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारत बँकेची सत्ता हाती घेतली.

मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला. माळशिरस कार्यकारी सोसायटीतून विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झाले. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला एकही जागा मिळवत्या आल्या नाहीत. सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या बँक गटातील निवडणुकीत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांचा विजय झाला. अवघ्या २० मतांनी सुभाष देशमुख यांचे पुत्र मनीष देशमुख यांची सोलापूर जिल्हा बँकेत एन्ट्री झाली. भाजपचे मनीष देशमुख विरुद्ध मोहिते पाटील गटाचे अमोल शिंदे यांच्यात लढत झाली. मनीष देशमुख यांच्या विजयानंतर देशमुख समर्थकांकडून 'गद्दार गद्दार' म्हणत घोषणाबाजी करण्यात आली.

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Election: मोठी बातमी! भाजपची आणखी एका पक्षासोबत युती, अमित शाह यांची दिल्लीत घोषणा

या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलला मोहिते पाटलांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे आव्हान होतं. सर्वाधिक चर्चेची लढत बँक आणि पतसंस्था मतदारसंघातून मनीष देशमुख आणि शिवसेना शिंदे पक्षाचे अमोल शिंदे यांच्यात पाहायला मिळाली. मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शेवटच्या एका जागेवर भाजप आणि मोहिते पाटील गटामध्ये जोरदार चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. शेवटी या जागेवर देखील भाजपनेच विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Election Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयकुमार गोरेंना धक्का, मोहिते पाटलांच्या पॅनलचा पहिला उमेदवार विजयी

भाजप प्रणित सहकार विकास पॅनल बिनविरोध उमेदवार -

बिनविरोध उमेदवार -

1) राजेंद्र राऊत : बार्शी वि. सोसा.

2) प्रशांत परिचारक : पंढरपूर वि. सोसा.

3) विक्रांत (बाळराजे) पाटील : मोहोळ वि. सोसा.

4) सिद्धेश्वर आवताडे : मंगळवेढा वि. सोसा.

5) यशराज शिंदे : माढा वि. सोसा.

6) श्रीदीप हसापुरे : दक्षिण सोलापूर वि. सोसा.

7) पृथ्वीराज माने : उत्तर सोलापूर वि. सोसा.

8) शंभूराजे जगताप : करमाळा वि. सोसा.

9) सचिन कल्याणशेट्टी : अक्कलकोट वि. सोसा.

10) अजिंक्यराणा पाटील : ओबीसी

भाजप पुरस्कृत पॅनलचे निवडून आलेले सदस्य -

1) बाबासाहेब देशमुख : (सांगोला वि. सो.)

2) अर्चना घाडगे : (महिला)

3) शामल बागल : (महिला)

4) राजेंद्र बंदीछोडे : (इतर भटक्या जा.)

5) रणजितसिंह शिंदे : (कृषी व प्रक्रिया)

6) मनीष देशमुख : (बँक व पतसंस्था)

7) सूर्यादित्य साळुंखे : (दुग्ध विकास)

8) महादेव कांबळे : (अनुसूचित जाती)

स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल (मोहिते पाटील) निवडून आलेले सदस्य -

1) अर्जुनसिंह मोहिते पाटील : माळशिरस वि. सोसा.

Solapur Bank Election Result: सोलापूर बँक निवडणुकीत भाजपला मोठं यश, १९ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय
Solapur Drought Ground Report: बोरी नदी कोरडीठाक! दुष्काळाचं भयाण वास्तव, साम टीव्ही न्यूजचा ग्राऊंड रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.