बांगलादेश ताब्यात घेणार! डेडलाईनही ठरली; भाजप मंत्र्याचं वादग्रस्त विधान

BJP leader Arjun Singh's controversial statement: १६ डिसेंबर २०२६ रोजी बांगलादेशवर ताबा मिळवण्याबाबत भाजप नेते अर्जुन सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडालीय. शेख हसीना आणि बांगलादेशातील हिंदू समुदायाबद्दल अर्जुन सिंग नेमके काय म्हटले, ते जाणून घ्या.
BJP leader Arjun Singh's controversial statement about taking over Bangladesh
BJP leader Arjun Singh's controversial statement about taking over Bangladesh
Published On: 
Summary
  • बांगलादेशातील हिंदूंच्या हत्यांबाबत त्यांनी गंभीर आरोप केले.

  • या घटनांचा सूड घेतला जाईल, असे वक्तव्य केल्याची माहिती.

  • भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर विधान चर्चेत

पश्चिम बंगालमधील भाजप नेते अर्जुन सिंग यांनी बांगलादेशाबाबत एक वादग्रस्त विधान केलंय. १६ डिसेंबर २०२६ रोजी ज्या दिवशी शेख हसीना बांगलादेशात परतणार आहेत, त्या दिवशी त्या देशाचा ताबा घेऊ, असा दावा अर्जुन सिंग यांनी केलाय. बंगालमधील परिस्थिती आता अत्यंत टोकाच्या टप्प्यावर पोहोचली असून सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. बांगलादेशाबाबत आता कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही किंवा खपवूनही घेतली जाणार नाही. बांगलादेशात हिंदूंची नियमितपणे हत्या केली जात असल्याचे म्हणत त्यांनी याचा नक्कीच सूड घेतला जाईल.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव

बुधवारी संध्याकाळी 'गंगा आरती'नंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री अर्जुन सिंग यांनी हे वादग्रस्त विधान केलं. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणाव वाढलेला असतानाच हे विधान समोर आले आहे. शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. भारत शेख हसीना यांच्या सुरक्षेची खात्री मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी असे म्हटलं की, त्या एक गुन्हेगार आहेत आणि त्यांना बांगलादेशात परतण्याची परवानगी दिली तर ती केवळ एक कैदी म्हणूनच दिली जाईल.

शेख हसीना यांना कैदी म्हणून परत आणण्याचा प्रस्ताव

बांगलादेश खिलाफत मजलिसचे प्रमुख मौलाना मामुनुल हक यांनी शेख हसीना यांचा उल्लेख 'कैदी' असा केलाय. कैदी हस्तांतरण करारांतर्गत त्यांना भारतातून बांगलादेशात परत आणले जावे. कारण अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंसाचार, जाळपोळ आणि हत्यांच्या माध्यमातून बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बांगलादेशातील एका न्यायालयाने शेख हसीना यांना दोषी ठरवून त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलीय. ही शिक्षा त्या बांगलादेशात पोहोचताच त्वरित अमलात आणली जावी.

शेख हसीना १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतणार

उल्लेखनीय आहे की, शेख हसीना ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात आल्या होत्या. आणि दोन वर्षांनंतर, १६ डिसेंबर २०२६ रोजी त्या बांगलादेशला परततील. त्यांच्या प्रवक्त्याने एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर हा बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन आहे. या दिवशी बांगलादेश १९७१ च्या युद्धातील आपल्या विजयाचा उत्सव साजरा करतो. मात्र, शेख हसीना यांच्या परतण्यापूर्वीच, संपूर्ण देश हिंसाचार, तणाव आणि जाळपोळीच्या वातावरणाने वेढलेला आहे. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने शेख हसीना बांगलादेशात पाऊल ठेवताच त्यांना अटक करण्याचे आदेश दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.