Nira Devghar Dam : नीरा देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको; म्हसवड- माळशिरस मार्गावरील वाहतूक ठप्प

Pandharpur News : नीरा देवघर धरणातून दुष्काळी भागातील २२ गावांना पाणी मिळावे; या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांचा मागील ३० वर्षांपासून संघर्ष सूरू आहे. या भागातुल सुमारे 50 हजार शेतकरी पाण्यापासून वंचित
Nira Devghar Dam
Nira Devghar DamSaam tv
Published On

पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील काही गावांना पाण्याची समस्या असल्याने येथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे तालुक्यातील नीरा देवघर धरणाचे दुष्काळी २२ गावांना शेतीसाठी पाणी मिळावे; या मागणीसाठी आज माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. 

माळशिरस तालुक्यातील दुष्काळी भाग असलेल्या गावांमध्ये नेहमीच पाण्याची समस्या जाणवत असते. यामुळे तालुक्यातील नीरा देवघर धरणातून दुष्काळी भागातील २२ गावांना पाणी मिळावे; या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांचा मागील ३० वर्षांपासून संघर्ष सूरू आहे. या भागातुल सुमारे 50 हजार शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. 

Nira Devghar Dam
Ambarnath : बाप्पा समोरील मोदकाची तब्बल १ लाख ८५ हजारांची बोली; अंबरनाथमध्ये मोदकांचा लिलाव

सरकारकडून दुजाभाव 

शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीकडे या भागातील खासदार आणि आमदार विरोधी पक्षाचे असल्याने सरकार दुजा भाव करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पिकांना पाणी मिळत नाही. अर्थात तालुक्यात इतके मोठे धरण असून देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याची समस्या गंभीर होत आहे. परिणामी शेतकरी आता संतप्त झाले असून आज रास्तारोको करण्यात आला.

Nira Devghar Dam
Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा 

माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे म्हसवड - माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास शेतकर्यांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर सरकारने या भागातील कॅनलची कामे तातडीने सुरू करावी; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू इशारा आमदार उत्तमराव जानकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com