Sangli Breaking : वादळी वाऱ्यामुळं भिंत कोसळली, देवीच्या कार्यक्रमाला आलेल्या ६ भाविकांचा दबून मृत्यू

Tragedy in Sangli: सांगलीतील जत तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे चिराविटांची भिंत कोसळली. त्याखाली दबून सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाले.
sangli jat news
sangli jat news saam tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कच्ची भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १० ते १२ जण गंभीर जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

sangli jat news
NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त हे सर्व भाविक येथे आले होते. कार्यक्रमावेळी वादळी वारा सुटला होता. वाऱ्यापासून बचावासाठी भाविकांनी बांधकाम सुरू असलेल्या चिराविटांच्या भिंतीजवळ आसरा घेतला होता. त्याचवेळी वादळी वाऱ्यामुळं तेथील पत्र्याचं शेड उडालं आणि त्या बांधकाम सुरू असलेल्या भिंतीवर पडलं. यात ती भिंत कोसळली. भिंतीचा भाग भाविकांच्या अंगावर कोसळून त्याखाली दबून सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

sangli jat news
Maharasahtra Heatwave: विदर्भात सूर्य कोपला, प्रत्येक जिल्ह्याचा पारा 42 पार, नागपुरात शाळांना सुट्टी

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वारा व पाऊस सुरू झाला. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या भाविकांनी जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आसरा घेतला. दरम्यान यावेळी वादळी वाऱ्यामुळे भले मोठे पत्र्याच्या शेड उडून थेट चिरावीटाच्या भिंतीवर येऊन पडल्यामुळे भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 10 ते 12 हे भाविक जखमी झाले आहेत.

sangli jat news
VIjay Shivtare | Shivsena शिस्तपालन समितीकडून शिवतारेंना नोटीस, 24तासांत उत्तराचे आदेश |Marathi News

जखमींना जतच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर याठिकाणी करण्यात आलेल्या बांधकाम ही निकृष्ट दर्जाचे केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. सदर घटनेमुळे जत तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com