Maharasahtra Heatwave: विदर्भात सूर्य कोपला, प्रत्येक जिल्ह्याचा पारा 42 पार, नागपुरात शाळांना सुट्टी

Nagpur School Holiday Due to Vidharbha Heatwave : विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. आज विदर्भात ६ जिल्ह्यांमध्ये ४२ अंशापेक्षा जास्त तापमान आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Maharasahtra Heatwave
Maharasahtra HeatwaveSaam tv
Published On
Summary

महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा

विदर्भात तापमान ४४ अंश पार

अनेक जिल्ह्यात शाळा-कॉलेजला सुट्टी

राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

Maharasahtra Heatwave
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादीच्या पाटलांची मंत्रिपदावर वर्णी लागणार?

नागपूरात शाळांना सुट्टी (School Holiday in Nagpur)

विदर्भात तापामानाचा पारा वाढतच आहेत. वाढतं तापमान आणि उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज नागपुरात शाळा-कॉलेजला सुट्टी असणार आहे. विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

विदर्भात सर्वाधिक तापमान (Vidharbha Heatwave)

विदर्भात सर्वात जास्त तापमान आहे. अमरावतीत तर ४४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सियलपेक्षाही जास्त आहे. अकोला हा तर जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. दरम्यान, काल अकोल्याच्या तापमानात किंचिंत घट झाली होती. मात्र, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशीम आणि गडचिरोलीच्या तापमानात वाढ झाली आहे.

Maharasahtra Heatwave
Maharashtra Heatwave: सूर्य कोपला; तुमच्या जिल्ह्याचं तापमान किती?

विदर्भातील शहरांचे तापमान (Vidharbha District Weather Update)

अकोला - 44.1

अमरावती - 44.4

भंडारा - 42.0

बुलढाणा - 41.2

चंद्रपूर - 43.6

गडचिरोली - 44.0

गोंदिया - 42.9

नागपूर - 44.0

वर्धा - 44.4

वाशीम - 44.0

यवतमाळ - 42.8

Maharasahtra Heatwave
Summer Heatwave: राज्यात उन्हाचा पारा वाढला! उन्हाळ्यात काय करावे आणि काय टाळावे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com